औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ( दि २८) रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची महिती बोर्डाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली होती.विभागातील एकूण ३८८ केंद्रावर सदरील परीक्षा घेण्यात आली त्यात एकूण १ लाख ६८ हजार २५१ विद्यार्थांनी परीक्षा दिली त्यात मुली ६३ हजार ३३० तर १ लाख ४ हजार ९२१ मुलांनी परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपणार असून उद्या ऑनलाईन निकाल जाहीर केला जाणार आहे. परीक्षार्थींना बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पहाता येणार आहे.